‘खुलताबादला दुष्काळग्रस्त जाहीर करा’

May 17, 2013 7:11 AM0 commentsViews: 4

औरंगाबाद 17 मे : येथील खुलताबाद तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावं अशी मागणी करत गावकर्‍यांनी बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहेत. खुलताबाद तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तालुक्याची आणेवारी 50 टक्क्याच्या वर आहे म्हणून तालुक्याला दुष्काळग्रस्त गावांच्या यादीतून वगळण्यात आलं होतं.

मात्र आज 11 गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. अनेक गावच्या विहिरी अधिग्रहीत कऱण्यात आल्या आहेत. तरी शासन तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करायला तयार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठं नूकसान सहन करावं लागणार आहे. शेती वाळल्यात मात्र त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर संकट निर्माण झालंय. जो पर्यंत तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे.

close