‘सत्यम’ वरील कारवाईस उशीर

January 8, 2009 10:17 AM0 commentsViews: 7

8 जानेवारी, मुंबईकविता कृष्णन, छवि डांगपाच हजार कोटींपेक्षाही जास्त असणार्‍या सत्यमच्या घोटाळ्याने कॉर्पोरेट सेक्टरची झोप उडवली. सत्यमचा घोटाळा उघड होऊन चोवीस तास उलटले. पण अजूनही कोणतीही कारवाईझाली नाही. कारवाईला उशीर का होतोय ? यासंदर्भात कायदेशीर एजन्सींचं काय म्हणणं आहे ? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.सत्यमच्या बाबतीत सरकारनं अजुनही कोणतीही कारवाई केलेली नाहीये. पण रामलिंग राजू आणि त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या विरोधात तीन विविध कलमांखाली कारवाई होऊ शकते. पहिल्यांदा सिक्युरिटीज कंट्रोल अँड रेग्युलेशन अ‍ॅक्ट अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होईल. इंडियन पिनल कोडअंतर्गत त्यांच्यावर फसवेगिरीची कारवाई होऊ शकते. सेबी, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय, पोलिस आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग तिघांच्या अंतर्गत ही कारवाई होऊ शकते. एवढचं नाही तर गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्था ज्यांनी सत्यममध्ये पैसे गुंतवले होते, तेसुद्धा कंपनीला कोर्टात खेचू शकतात.या घोटाळ्यातील अजूनही काही बाबी उडणं होणं बाकी आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण आरोप सिद्ध झाला तर रामलिंग राजू यांना कमीत कमी सात वर्षाची शिक्षा होऊ शकते.भारतात अशाप्रकारचा घोटाळा पहिल्यांदाच समोर आलाय. सत्यमच्या या घोटाळ्याची कायदेशीर कारवाई करताना वर्ल्डकॉम आणि एनरॉन प्रकल्पाच्या घोटाळ्यांचा दाखला दिला जाऊ शकतो. वर्ल्डकॉमच्या घोटाळ्याप्रकरणी कंपनीच्या सीईओला पंचवीस वर्षांची शिक्षा झाली होती.

close