एलबीटीविरोधात व्यापारांच्या संपात मोठी फूट

May 17, 2013 12:47 PM0 commentsViews: 18

ठाणे 17 मे : गेल्या पंचवीस दिवसांपासून राज्यात एलबीटीच्या मुद्यावरुन सुरु असलेला व्यापार्‍यांच्या बंदमध्ये आता उभी फूट पडली आहे. अक्षयतृतीयाच्या मुहूर्तापासून अनेक ठिकाणी व्यापार्‍यांनी दुकानं उघडली होती. त्यानंतर हळूहळू बर्‍याच ठिकाणी बाजारपेठा सुरु होत होत्या.

ठाण्यात एलबीटीच्या मुद्यावरुन व्यापार्‍यांमध्ये फूट पडली आहे. दोन हजाराहून अधिक व्यापार्‍यांना स्वतःहून या करासाठी नोंदणी केली आहे. शिवाय आता एलबीटीचा भरणाही पालिकेच्या तिजोरीत होऊ लागला आहे. गेल्या 10 दिवसात पालिकेला तब्बल 7 कोटी रुपयांचा महसूल एलबीटीच्या करातून मिळाला आहे. ठाण्यातून किमान 30 हजार व्यापारी या करासाठी नोंदणी करतील असा पालिकेचा अंदाज असून, सुमारे 60 टक्के व्यापार्‍यांची यादी पालिकेकडे तयार झाली आहे.

नागपुरात एलबीटीविरोधी आंदोलनाच्या पाच दिवसाच्या स्थगितीनंतर कालपासून पुन्हा बंद पाळण्याचं आवाहन करण्यात येत होतं. मात्र, त्याला व्यापार्‍यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

पुण्यात बुधवारी तुळशीबागेतल्या व्यापार्‍यांनी दुकानं उघडली. पोलिसांचा बंदोबस्त घेऊन त्यांनी आपली दुकानं सुरु केली. मात्र अजूनही पुणे शहरातली बहुतांश दुकानं बंद आहेत.

close