स्पॉट फिक्सिंगचे अंडरवर्ल्ड कनेक्शन ?

May 17, 2013 4:33 PM0 commentsViews: 12

नवी दिल्ली 17 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता स्पॉट फिक्सिंग आणि अंडरवर्ल्डचे संबंध असल्याचं उघड होतं आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चंद्रेश या बूकीचे दुबाईमध्ये असलेल्या सुनील अभिचंदानी उर्फ सुनील दुबई या बुकीशी संबंध असल्याचं तापासात उघड झालंय.

या सुनील अभिचंदानीचे डी कंपनीशीही संबंध असल्याचा संशय दिल्ली पोलीस व्यक्त करत आहेत. सुनील अभिचंदानीविरोधात 2012 मध्ये लूकआऊट नोटीस बजावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील अभिचंदानी हा पाकिस्तान आणि दुबईतल्या बुकीजबरोबर कार्यरत असल्याचं स्पष्ट होतंय.

तर मुंबई पोलिसांनीही आता स्पॉट फिक्सिंगप्ररणी आपल्या तपासाला सुरुवात केलीय. गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी आयबीएन नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण फक्त 3 खेळाडू आणि एका टीमपुरतं मर्यादित नसून त्यात आणखीही काही टीम्सचा आणि खेळाडूंचा सहभाग असू शकतो. इतकचं नाही या प्रकरणी आणखीही काही खेळाडूंना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुंबईतून दोन बुकींच्या साथीदारांना अटकमेश व्यास या बुकीच्या आणखी दोन साथीदारांना मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकार्‍यांनी अटक केलीय. सट्टेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांना काल दोन बुकींना अटक केली होती. प्रवीण बेरा उर्फ प्रवीण भांडुप उर्फ पीडी आणि नीरज शहा उर्फ चिंटू या दोघांना काल मुंबईत अटक झाली होती.

प्रवीण भांडुप मोठा सट्टेबाज आहे तर नीरज शहाने त्याला मोबाईल सीमकार्ड पुरवले होते. आज या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्या तपासात अनेक बुकीची नाव उघडकीला आली आहेत. या दोघांचाही स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

close