संजय दत्त निवडणूक लढवणार

January 8, 2009 10:44 AM0 commentsViews: 11

8 जानेवारी, दिल्लीरफ अ‍ॅन्ड टफ इमेज असलेला मुन्नाभाई संजय दत्त आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे समाजवादी पक्षातर्फे संजय दत्तला उत्तरप्रदेशमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तो लखनौ मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवेल. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अमरसिंह यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले. त्यात संजय दत्त यांच्या नावाची घोषणा केली. लखनौ मतदारसंघ हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजेपायी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे आता भाजपच्या लखनौमधील उमेदवरांकडे सगळ्यांचच लक्ष असेल.समाजवादी पक्षाकडे नेहमीच स्टार प्रचारकांची मांदियाळी राहिली आहे. समाजवादी पक्षाचे नेत अमरसिंह नेहमीच त्यांच्या पेज थ्री कल्चरमुळे चर्चेत राहिले आहेत. याआधीही समाजवादी पक्षातर्फे जया बच्चन राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. आता या यादीत संजय दत्त यांचा समावेश झाला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तवर आरोप झाले असले, तरी त्याची लार्जर दॅन लाईफ इमेज आणि तुफान लोकप्रियता यांचा पक्षाला फायदा होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त काँग्रेसतर्फे मुंबईतल्या वांद्रा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचे. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत यशाची चढती कमान कायम ठेवली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर संजयची बहिण प्रिया दत्त त्यांचा वारसा चालवेल, असं मानलं जात आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार आहे. त्यामुळेच मित्रपक्षात ही सेटलमेंट झाल्याची चर्चा आहे.समाजवादी पक्षाचे इतर उमेदवार असे आहेत : रामपूर -जया प्रदा ,गोरखपूर – मनोज तिवारी ,बदानयू-धर्मेंद्र यादव , मनीपूरी- मुलायम सिंग , कनौज आणि फिरोझाबाद- अखिलेश यादव.

close