‘बेडसे-भुजबळांच्या व्यावसायिक संबंधांची चौकशी करा’

May 18, 2013 9:44 AM0 commentsViews: 29

मुंबई 18 मे : सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी संदीप बेडसेंच्या व्यावसायिक संबंधांची चौकशी करा अशी मागणी भाजप नेत किरीट सोमय्या यांनी अँटीकरप्शन ब्युरोकडे केलीय. मैत्री इन्फ्रास्टक्चर आणि भावेश बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये भुजबळ आणि बेडसे कुटुंबीय डायरेक्टर पदावर आहेत असा दावाही त्यांनी केला.

बेडसेंना बडतर्फ का केले नाही असा सवालही सोमय्यांनी भुजबळांना विचारला आहे. या अगोदरही सोमय्या यांनी लाचखोर सतीश चिखलीकर आणि भुजबळांचे संबंध असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

दरम्यान, लाचखोरी प्रकरणाचं वाद सुरू असताना संदीप बेडसेंची अचानक बदली करण्यात आली. बेडसे हे भुजबळांच्या मर्जीतले अधिकारी असल्यामुळे प्रकरण वाढू नये म्हणून बदली करण्यात आली असा आरोप सोमय्यांनी केला होता.

close