मॉन्सून अंदमानमध्ये दाखल

May 18, 2013 10:27 AM0 commentsViews: 35

18 मे

सध्या प्रचंड उष्म्यामुळं अंगाची काहिली होत असताना एक आनंदाची बातमी आहे. सर्वात आधी मॉन्सूनचं आगमन होतं ते अंदमान आणि निकोबारमध्ये, काल ही प्रतिक्षा संपली असून मॉन्सून अंदमानच्या काही भागात दाखल झाला आहे. दरवर्षी 20 मेच्या दरम्यान मॉन्सून अंदमान दाखल होतो, मात्र यावेळी बंगालच्या उपसागरात महासेन हे चक्रीवादळ आल्यानं मॉन्सून तीन दिवस आधीच आल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं. त्यामुळे अंदमान व निकोबारमध्ये कालपासून मुसळधार पाऊसही सुरू झालाय. त्यामुळे देशात काही ठिकाणी पारा खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आणि नियोजित वेळेतच मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.

close