महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात

January 8, 2009 10:55 AM0 commentsViews: 5

8 जानेवारी सांगलीमानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सांगली जिल्ह्यात कडगाव इथं सुरुवात झाली. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. कडगाव सारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन होत असलं तरी तयारी पूर्ण झाली असल्याचं आयोजकांनी म्हटलंय. स्पर्धेसाठी एक मातीचा आणि दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट आखाडे तयार करण्यात आले आहेत. तर तब्बल 75 हजार लोक एकावेळी कुस्ती पाहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेत विविध वयोगटात जवळजवळ 616 कुस्तीपटू सहभागी होत आहेत.

close