चिखलीकरचं इंजिनिअर्स फेडरेशनचं सदस्यत्व रद्द

May 18, 2013 3:33 PM0 commentsViews: 13

नाशिक 18 मे : सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र इंजिनिअर्स फेडरेशनने घेतला आहेत. तसेच ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांची चौकशी करावी अशी मागणीसुद्धा फेडरेशनने सरकारकडे केलीय. याशिवाय, अभियंते आणि अधिकार्‍यांच्या नातेवाईकांना जर नियमबाह्यरितेने कंत्राटं दिले असतील तर त्यांचीही चौकशी व्हावी अशी भूमिका फेडरेशननं मांडली. तसेच फेडरेशनचे उपाध्यक्ष ए. व्ही. देवधर हे जर मुलाच्या सासर्‍यांना मिळालेल्या कंत्राटांमध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यास हरकत नसल्याचं फेडरेशननी स्पष्ट केलं आहे.

close