उल्हासनगरमध्ये गुंडांचा उच्छाद, 15 रिक्षांची तोडफोड

May 20, 2013 9:35 AM0 commentsViews: 5

मुंबई 20 मे : उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेर गुंडांनी धुमाकुळ घालत रिक्षांची मोडतोड केली. यात 15 रिक्षांचं नुकसान झालं असून एक प्रवासी आणि एक रिक्षाचालक जखमी झालाय. रविवारी रात्री उशिरा 25 ते 30 गुंड तोंडाला रुमाल बांधून रेल्वेस्थानक परिसरात दाखल झाले. त्यांनी बरोबर आणलेल्या लोखंडी पाईप, सळ्या, बांबू घेऊन त्यांनी उभ्या असलेल्या रिक्षांवर हल्ला चढवला.

अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवाशांमध्ये चांगलीच धावपळ उडाली, आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण या सर्व प्रकरणावर पोलीस मात्र गप्प आहेत. याविषयी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आत्माराम पाटील यांना माहिती विचारली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

close