पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 मुलींसह मॉडेलची सुटका

May 20, 2013 3:23 PM0 commentsViews: 228

पुणे 20 मे : महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी पुणे सेक्स रॅकेटमुळे पुन्हा बदनामा झाली. शहरातील वडगावशेरी भागातील उच्चंभ्रू ला ग्लोरीसा सोसायटीतील फ्लॅट नंबर 403 वर धाड टाकून सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मागील काही महिन्यापासून या सोसायटीत हा सेक्स रॅकेट चालविण्यात येत होता. याची खबर पोलिसांना मिळताच आज धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्प वयीन मुलींची आणि एका महिलेची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेली एक महिला मॉडेल आहे. तिने 'सीआयडी'या मालिकेमध्ये अभिनय केला आहे. तर दुसरी महिला बांगलादेशची आहे. या प्रकरणात पोलिसांनी हरिदास शेरी, प्रकाश वाघमारे आणि तुषार पाटील या तीन दलालांना अटक केली आहे.

close