IPL वर बंदी नाही !

May 21, 2013 9:34 AM0 commentsViews: 15

नवी दिल्ली 21 मे : स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या आयपीएलच्या प्ले ऑफ आणि फायनल मॅचवर स्थगिती आणावी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने आयपीएलला दिलासा दिला आहे. आयपीएलला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. पण कोर्टाने बीसीसीआयला काही निर्देश दिलेत. बीसीसीआयतर्फे रवी सवानी या प्रकरणाचा अहवाल तयार करतील आणि बीसीसीआयने हा अहवाल दोन आठवड्यात कोर्टासमोर सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तर प्रत्येक टीमसोबत यानंतर अँटी करप्शन विभागाचे अधिकारी असतील हे आश्वासन बीसीसीआयने कोर्टाला दिलं आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

close