गावकर्‍यांनी टाकला दलित वस्तीवर बहिष्कार

May 21, 2013 10:10 AM0 commentsViews: 60

पंढरपूर 21 मे: अंजनसोंड गावातल्या दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्यानंतर आता गावकर्‍यांनी दलितांवर बहिष्कार टाकला आहे. आपल्यावर झालेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी आता सवर्णांनी या दलितवस्तीवर बहिष्कार टाकला. या बहिष्कारामुळे दलितवस्तीतल्या स्त्रीयांना गावच्या हातपंपावर पाणी भरण्यास मज्जाव करण्यात आलाय.

दलित मजुरांनाही शेतावरच्या कामाला यायला बंदी घालून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकच नाही तर दलितांच्या मुक्या जनावरांना देखील सवर्णांच्या शेतांमध्ये चरण्यास बंदी घालण्यात आली आहे. हल्ल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आली अस वाटत असताना गावकर्‍यांनी बहिष्काराचा मार्ग अवलंबल्याने अजनसोंड गावची स्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे.

अंजनसोंडगावल्या चौकाला नाव देण्यावरून झालेल्या वादानंतर मागिल आठवड्यात शुक्रवारी रात्री दलित वस्तीवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 15 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये महिला आणि वृद्धांनाही मारहाण झालीय. या प्रकरणी पोलिसांनी 10 हल्लेखोरांना अटक केली होती. आपल्यावर झालेल्या कारवाईचा राग धरून सवर्णांनी या दलितवस्तीवर बहिष्कार टाकला. या बहिष्कारामुळे दलितवस्तीतल्या स्त्रीयांना स्त्रीयांना गावच्या हापश्यावर पाणी भरण्यास मज्जाव करण्यात आला.

दलित मजुरांनाही शेतावरच्या कामाला यायला बंदी घालून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकच नाही तर दलितांच्या मुक्या जनावरांना देखील सवर्णांच्या शेतांमध्ये चरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्वबाजूंनी केलेल्या या अमानुष कोंडीमुळे इथला दलित हतबल झालाय. रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी या गावाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यावेळी दलितांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला.

शासकीय यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना सवर्णांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने ही स्थितीजर अशीच राहिली तर दलितांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया आठवलेंनी व्यक्त केली. हा जातीय तणाव दूर करण्यासाठी शासकीय यंत्रणा पुढे सरसावल्या असल्या तरी दलितेतर समाजाकडून या कामाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

close