पुणे वगळला, नागपूर आणि कोल्हापुरात दुकानं बंदच

May 21, 2013 10:47 AM0 commentsViews: 27

पुणे 21 मे : पुण्यात तब्बल 22 दिवसांनंतर आज दुकानं उघडली. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर व्यापार्‍यांच्या प्रतिनिधींनी बंद मागे घेण्याची घोषणा केली. पूना मर्चंट्स चेंबरनं कालच हा बंद मागे घेतला होता. आता दुकानं सुरू झाल्याने पुणेकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

नागपूरमध्ये मात्र व्यापार्‍यांच्या एका गटाचा एलबीटीला विरोध कायम आहे. सरकारने आमच्याशी कुठलीही चर्चा केलेली नाही असा आरोप नागपूरच्या व्यापार्‍यांनी केलाय. तर कोल्हापुरमध्ये सुध्दा गेल्या 12 दिवसांपासून कडकडीत बंद पाळण्यात येतोय. आज संध्याकाळी व्यापार्‍यांची बैठक होतेय. त्यानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. कोल्हापुरमध्ये 2 वर्षांपूर्वी एलबीटी कर लागू करण्यात आला आहे.

close