पंकजा मुंडेंची भायुमोच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

May 21, 2013 3:06 PM0 commentsViews: 134

मुंबई 21 मे : लोकसभा निवडणुका लक्षात घेत भाजपच्या नव्या कार्यकारिणीत आज बदल करण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि आमदार पंकजा मुंडे-पालवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रदेश कार्यकारिणीत युवा नेत्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली. महामंत्रीपदी रणजीत पाटील, राम शिंदे, संभाजी निलंगेकर, बाळा भेगडे यांचा समावेश आहे. भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी स्मिता वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. पंकजा मुंडे यांना पक्षात अधिक मोठी जबाबदारी देण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अगोदर एकमत झालं होतं. त्यामुळे आज फक्त नावाची औपचारिक घोषणा पार पडली. .