उद्धव ठाकरेंकडून दुष्काळग्रस्तांची ‘बिस्लेरी’वर बोळवण

May 24, 2013 2:14 PM0 commentsViews: 14

24 मे

मध्य वैतरणा धरणाची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे, स्थानीक गावकर्‍यांनी त्यांच्या पाणी टंचाईची समस्या मांडली. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची समस्या सोडवण्यास असमर्थता तर दर्शवलीच पण पाणी मागण्यासाठी आलेल्या गावकर्‍यांना बिस्लेरी पाण्याच्या बाटल्या दिल्या. येथील स्थानिक आमदार शिवसेनेचेच असून देखील शिवसेना पक्ष प्रमुखांच्या अशा वागण्याने गावकर्‍यांनी नाराजी व्यक्तं केली.

close