‘लोकमत लढा दुष्काळाशी’ उपक्रमाचा समारोप

May 24, 2013 9:30 AM0 commentsViews: 39

सोलापूर 24 मे : इथं लोकमत माध्यम समूहाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'लढा दुष्काळाशी' या उपक्रमाची सांगता झाली. उत्तर सोलापुरातील हिप्परगा तालुक्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सांगता समारंभासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि पाणीपुरवठामंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमाअंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामं करण्यात आली. आणि त्यातून जिल्ह्यातील तलावांमधून जवळपास पंचवीस लाख ब्रास गाळ उपसण्यात आला. यामुळे पावसाळ्यात गावाच्या शिवारांमधून वाहून जाणार्‍या पाण्याची तलावात साठवण करता येईल.

close