शिबु सोरेन हरले

January 8, 2009 6:46 AM0 commentsViews: 2

8 जानेवारी रांचीझारखंडचे मुख्यमंत्री शिबु सोरेन यांना पराभवाचा धक्का बसला आहे. झारखंडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा 9000 मतांनी पराभव झाला. तिमाड मतदार संघातून त्यांना निवडणूक लढवली होती. राजा पेटेर यांनी त्यांचा पराभव केला. सोरेन यांच्या पराभवामुळे झारखंड सरकार अडचणीत आलं आहे. आता तिथं राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. तिथं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. घटनेनुसार सहा महिन्याच्या आत त्यांना विधानसभेत निवडून येणं आवश्यक होतं.

close