नॅशनल पार्कमध्ये बिबट्याच राजा !

May 27, 2013 2:03 PM0 commentsViews: 83

उदय जाधव, मुंबई

मुंबई 27 मे : बुद्धपोर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व जंगलांमध्ये प्राण्यांची गणना करण्यात आली. या जंगलातील गणनेत सर्वाचं लक्ष लागलेलं असतं ते वाघ आणि बिबट्यांवर…मुंबईतल्या नॅशनल पार्कमध्येही ही गणना करण्यात आली. पण यंदा या गणनेत बिबट्याने बाजी मारली.

मुंबईतलं नॅशनल पार्क एकशे चार चौरस किलोमीटर परिसरात पसरलंय. आणी या जंगलाचा राजा आहे बिबट्या..बुद्ध पोर्णिमेला जेंव्हा प्राण्यांची प्रगणना झाली तेंव्हा सर्वांच्या नजरा या राजबिंड्या प्राण्यावरच होती. पार्कचे वन रक्षक प्रशांत जाधव पाणवठ्याजवळ बिबट्याच्या पायांचे ठसे शोधतात. ठसे सापडल्यानंतर त्या ठश्यांचा साचा तयार करुन घेतात. जेणे करुन बिबट्यांची योग्य मोजदात करता येईल.

नॅशनल पार्कमध्ये बिबट्यांसोबतच त्यांच अन्न असणारी हरणं ही सर्वांना आकर्षित करतात. त्यांच्या सहज वावरण्याने हे जंगल समृद्ध असल्याचं दिसून येतं. पार्कमध्ये बिबट्यांचे सव्वीस कोअर विभाग आहेत. या प्रत्येक विभागात बिबट्यांचा वावर आहे. तसेच जंगलातील इतरही प्राण्यांची मोजदाद करण्यासाठी विशेष मचाण तयार करण्यात आलीत. या मचाणावर पोर्णिमेच्या रात्री रात्रभर राहुन ही प्रगणना केली जाते. यामुळे जैवसाखळीत वन्यप्राणी किती महत्वाची आहेत याची खात्री पटते.

close