मड-बाईकिंगचा थरार मुंबईत !

May 27, 2013 3:25 PM0 commentsViews: 27

रोहन कदम,मुंबई

मुंबई 27 मे : वेगाने बाईक चालवणं आणि रायडिंगचा मनसोक्त आनंद घेणं ही खर्‍या बाईकरची ओळख…पण ट्रॅफिकने भरलेल्या शहरांतल्या रस्त्यांवर हे शक्य होत नाही आणि तसं करणं धोक्याचंही ठरू शकतं. पण रेसिंग चॅम्प रुस्तम पटेलनं सुरू केलीय भारतातील पहिली मड बाईक रायडिंग ट्रेनिंग ऍकॅडमी..पाहूयात मड बाईकिंगचा हा एक ऍडव्हेंचरस रिपोर्ट… (प्रेक्षकांनी कृपया योग्य मार्गदर्शनाशिवाय हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करू नये.)

स्वत: आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असलेल्या रुस्तुम पटेलला बाईक रायडिंगचं भन्नाट वेड. आपल्या प्रोफेशनल करिअरमधून निवृत्त झाल्यावर रुस्तुमने इतर बाईक शौकिनांनाही ट्रेनिंग द्यायचं ठरवलं आणि यातूनच सुरू झाली 'आयलँड' ही देशातील पहिली मड-बाईकिंग ट्रेनिंग ऍकॅडमी.

बाईक रायडिंग म्हटलं की त्यात अपघात आणि दुखापतीचे चान्सेसही आले, त्यामुळे SAFETY FIRST! विशेष म्हणजे इथे प्रोफेशनल रेसर्ससोबतच नवख्या रायडर्सनाही खास प्रशिक्षण दिलं जातं.

मड बाईकिंग म्हणजेच, चिखलाने भरलेल्या किंवा ओल्या रस्त्यावर बाईक चालवणं. ज्यांना मड बाईकिंगचा आनंद घ्यायचा आहे त्यांसाठीही,आणि ज्यांना प्रोफेशनल रेसर व्हायचयं त्या दोघांसाठीही ही रेसिंग ऍकॅडमी एक चांगलं ट्रेनिंग सेंटर आहे. वडाळयाच्या भक्ती पार्कमधला हा रेसिंग ट्रॅक …..350 मीटर लांब आहे, 350 मीटर म्हणजे… थरार थरार आणि फक्त थरार…

close