नाशिकमध्ये तोपची दिन साजरा

January 8, 2009 8:58 AM0 commentsViews: 2

8 जानेवारी, नाशिकतोपची दिनाच्या निमित्तानं भारतीय लष्कराच्या तोफांची ताकद आज पाहायला मिळाली. भारतीय लष्कराच्या तोफखान्यातर्फे तोपची दिन साजरा करण्यात येतो. त्यावेळी ही तोफांची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. या प्रात्यक्षिकांना नेपाळ आणि इंग्लंडच्या लष्कराचे अधिकारीही उपस्थित होते. पूर्वीच्या काळी खेचरांवरून वाहून आणणार्‍या तोफाही यात होत्या. या जुन्या तोफांपासून ते ऑटोमेटीक बोफोर्सपर्यंत सर्व तोफांचं प्रदर्शन यावेळी करण्यात आलं. सैनिकांची शिस्त, अवजड तोफा काही सेकंदात असेम्बल करण्याचं कौशल्य, चिता आणि चेतक या हेलिकॉप्टर्सची मदत आणि लक्ष्याचा अचूक वेध या चित्तधरारक कसरती भारताचं सामर्थ्य दाखवणार्‍या होत्या. भारताकडून याचं प्रशिक्षण घेणारे दुसर्‍या देशांचे सैनिकही यावेळी उपस्थित होते.

close