पावसाच्या आगमनासाठी गाढवाचं लग्न !

May 28, 2013 4:23 PM0 commentsViews: 46

सोलापूर 28 मे : इथं एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. वरूण आणि पृथ्वी या वधू वरांच्या शाही विवाह सोहळ्याला गावकर्‍यांची गर्दी झाली होती. ही वरूण आणि पृथ्वी होती चक्क दोन गाढवं. लोकवर्गणीतून आयोजित केलेला हा विवाह सोहळा लक्षवेधी ठरला. पावसाच्या आगमनासाठी हा वैशिष्ठपूर्ण विवाह सोहळा होता. गाढवांच्या लग्न सोहळ्याने पावसाचं आवाहन करायची पद्धत या गावाची ही जुनी परंपरा आहे.भारतात अनादी लग्न सोहळ्याने पावसांचे आवाहन करायची पूर्वीच्या काळापासून चालत आलीय. केगाव देगाव रोडवरच्या देशमुख वस्तीवर हा विवाह सोहळा पार पडला. यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळाचं सावट आहे. गाढवाचं लग्न लावल्यावर वरूणराजा प्रसन्न होतोअशी लोकांची भावना अजूनही आहे.

close