राहुल गांधींचा दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौरा

May 28, 2013 12:26 PM0 commentsViews: 11

औरंगाबाद 28 मे : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज एका दिवसाच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर आले आहेत. फुलंब्री तालुक्यात एका चारा छावणीला त्यांनी भेट दिली. आणि तिथल्या गुरांना त्यांनी चारादेखील खाऊ घातला. राहुल त्यांच्या दौर्‍यात निधोनामधल्या नरेगाच्या कामाची पाहणी करणार आहेत. तसंच बाबरामधल्या चारा छावणीलाही भेट दिली. राहुलसोबत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसंच राज्याचे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात हेही होते. राहुल गांधी याआधी 27 आणि 28 मे या दोन दिवशी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार होते. मात्र, छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर या दौर्‍याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला.

close