संपक-यांवर सरकारचा बडगा

January 8, 2009 1:19 PM0 commentsViews: 4

8 जानेवारी मुंबई वाहतूकदार आणि तेल कंपन्यांच्या अधिका-यांच्या संपाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा साठाही संपत चालला आहे. तसेच तेल आणि नैसर्गिक वायू आणि इंधनाचा पुरवठा ठप्प झाला आहे. मालवाहतूक करणा-या वाहनांच्या संपामुळे जीवनावश्यक वस्तूचा तुडवडा जाणवत आहे. याच कारणामुळे जीवनावश्यक वस्तू थांबवणा-या संस्था अगर व्यक्तींवर 'मेस्मा' म्हणजेच महाराष्ट्र जीवनावश्यक सेवा देखभाल कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकार करीत आहे असं राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी सांगितलं. सध्याच्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तसंच संपामुळे राज्यातल्या वीजनिर्मितीतही मोठी कमतरता जाणवत आहे.उरण प्रकल्पातली वीजनिमिर्ती ठप्प झाली आहे. तर दाभोळ प्रकल्पातून आज केवळ 150 मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकली असंही मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी यावेळी सांगितलं.

close