पुणे फिल्म फेस्टिव्हल सुरू

January 8, 2009 1:27 PM0 commentsViews: 2

8 जानेवारी पुणेसातवा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. 15 जानेवारीपर्यंत चालणा-या या फेस्टिव्हलमध्ये 42 देशांचे 150 सिनेमे रसिकांना पाहायला मिळणार आहेत. परसे पोलीस या फ्रान्सच्या सिनेमाने फेस्टिव्हलची सुरुवात होईल. कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर सुलोचनादीदी,शशी कपूर आणि हेमा मालिनी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणा-या उदघाटनाच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशींचा सत्कार करण्यात येणार आहे. या महोत्सवात 30 परदेशी सिनेमे आणि 109 भारतातील सिनेमे दाखवले जातील. तर मराठी सिनेमा विभागामध्ये गंध, दु:खांचं श्वापद, हरिश्चंद्रांची फॅक्टरी, जोगवा, बाईमाणूस, आणि घो मला असला हवा या सिनेमांचा समावेश आहे. फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोत्कृष्ठ जागतिक सिनेमा असाही पुरस्कार ठेवला आहे आणि त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला संत तुकाराम अ‍ॅवॉर्ड दिलं जाईल. तसंच, सर्वोत्कृष्ठ मराठी सिनेमा आणि त्याच्या दिग्दर्शकाला प्रभात पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

close