देवकरांवरून राष्ट्रवादीत मतभेद

May 30, 2013 1:48 PM0 commentsViews: 40

मुंबई 30 मे : जळगाव घरकुल घोटाळ्यात आरोपी असलेल्या गुलाबराव देवकरांनी आज कोर्टात सर्व गुन्हे नाकारले. राष्ट्रवादी काँग्रेसने ते निर्दोष असल्याचा दावा केलाय. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र दोषींवर कारवाई करू मग कोणताही मंत्री असला तरी त्यावर कारवाई होणार असं म्हटलंय. तर दुसरीकडे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवकर यांच्यावर आरोप झाले आहे. भलेही त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले असेल पण अजून त्यांच्यावर आरोप निश्चित झाले नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच एकमत दिसत नसल्याचं पुढे येतंय.

close