कडेगावचा मोहरम

January 8, 2009 5:44 AM0 commentsViews: 100

8 जानेवारी सांगली हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असणा-या सांगली जिल्ह्यातील कडेगांव इथं मोहरम साजरा होत आहे. कडेगावात एकूण 14 ताबूत बसवण्यात आले आहेत. ही परंपरा गेल्या 200 वर्षांपासून सुरू आहे. मोहरम हा चांद्रवर्षाचा पहिला महिना आहे. इस्लाम धर्मात हा महिना पवित्र आणि तेवढाच श्रेष्ठ मानला जातो. आजच्या दिवशी करबला इथं युद्धात हजरत इमाम हुसेन शहिद झाले. त्यांच्या आठवणीत सुन्नी मुस्लिम बांधव दहा दिवस सवारीया, ताजिए, आणि पंजे बसवतात. त्यांचं आज विर्सजन करण्यात येतं. तर शिया बांधव मिरवणूक काढतात.

close