अजित पवार घोडेवाल्यांसोबतच जाणार -उद्धव ठाकरे

May 30, 2013 5:13 PM0 commentsViews: 51

औरंगाबाद 30 मे : अजित पवार घोडेवाल्यांसोबतच जाणार आहे. आम्ही सर्वसामान्यांच्या बरोबर आहोत. हे घोडेवाले कोण आहेत हे लोकांना चांगलं माहिती आहे अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी अजित पवारांवर केली. लोकांसाठी काम करा, लोकांना आनंद द्या आता पैसेवाल्यांचं काम पुरे झालं असा खोचक टोलाही उद्धव यांनी लगावला. आज महालक्ष्मी रेसकोर्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या शिवसेनेच्या भूमिकेला राष्ट्रवादीने खोडा घातला. मुंबई रेसकोर्सची 6 लाख स्केअर फूटची जाग सरकारची आहे, सरकारचं म्हणणं विचारात घ्यावं लागल, यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. सरकारकडून झालेल्या करारात काही चुका झाल्या आहेत, पण त्यात दुरुस्ती सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

close