काँग्रेसचे ‘झुटबोले’ आणि राष्ट्रवादीची ‘जलचोरी’चा विवाह !

May 31, 2013 12:03 PM0 commentsViews: 295

सोलापूर 31 मे : जिल्ह्यातील पाणीटंचाई बद्दल आवाज उठवणारे भय्या देशमुख यांनी सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्या कारभारावर टीका करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात एक अनोखा लग्नं सोहळा आयोजित केला आहे. पाच जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास लग्न सोहळा होणार आहे. आणि या लग्नं सोहळ्याची निमंत्रण पत्रिका यजमान भय्या देशमुख यांनी अतीशय मिश्कीलपणे पणे तयार करत सरकारवर बोचरी टीका केलीय.

काँग्रेस पक्षाचे सुपुत्र चिरंजीव 'झुटबोले' आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची चि. सौ. का.'जलचोरी' यांचा हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पाण्याच्या दुष्काळाकडे सरकारने आतातरी गांभिर्याने लक्ष द्यावं यासाठी भय्या देशमुख यांनी हा अभिनव लग्न सोहळा आयोजित केलांय.

या सोहळ्यासाठी त्यांनी राज्यातील सर्व बड्या नेत्यांना निमंत्रित केलंय. तसंच लग्न सोहळ्यात जेवन मिळेल मात्र पाणी मिळनार नाही आणि अहेर म्हणून फक्तं पाणी स्विकारले जाईल अशी टीपही दिली. त्यामुळे आता या दुष्काळग्रस्त वधूवरांना आशिर्वाद देण्यासाठी कोण कोण उपस्थित राहतंय याची उत्सुकता आता सर्वांना आहे.

close