रेसकोर्सवर थीम पार्क झालंच पाहिजे -उद्धव ठाकरे

June 2, 2013 2:23 PM0 commentsViews: 40

मुंबई 02 जुन : रेसकोर्सच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत महापौर सुनील प्रभू,स्थायी समितीचे अध्यक्ष राहूल शेवाळे, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, तसचं शिवसेनेचे नेते सुभाष देसाई उपस्थित होते. 40 मिनिटं ही बैठक चालली. या जागेवर थीम पार्क उभं करावं अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. तसंच त्याविषयीचा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर केला. या विषयावर राजकारण न आणता हा प्रकल्प व्हावा अशी इच्छा ठाकरे यांनी व्यक्त केलीय.

close