आठवलेंचं घूमजाव

June 2, 2013 2:24 PM0 commentsViews: 94

पंढरपूर 02 जुन : मनसेला महायुतीत घ्या या विधानापासून रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घुमजाव केलंय. मनसे शिवाय देखील राज्यात महायुतीची सत्ता येऊ शकते. त्यामुळे मनसेला महायुतीत घ्यायचं की, नाही यासंबंधीचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच राहिलं असं आठवले यांनी म्हटलंय. याबाबत येत्या आठवड्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होत आहे, त्यामध्ये यावर चर्चा होणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलंय. राज्यात महायुतीत ज्यांच्या जागा अधिक असतील त्यांचा मुख्यमंत्री असला तरी रिपाईला उपमुख्यमंत्रीपद द्यावं मागणी देखील आठवले यांनी केली. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. मागिल आठवड्यात रामदास आठवले यांनी एका जाहीर सभेत राज ठाकरे यांना महायुतीत यावं असं जाहीर आवाहन दिलं होतं. त्या या आवाहनामुळे शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये चांगलाच समाचार घेण्यात आला होता. त्यावेळी आठवले यांनी गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली होती.

close