कोकणी नाटक ‘ नंदादीप ‘ चा विक्रम

January 8, 2009 3:07 PM0 commentsViews: 11

8 जानेवारीअजय परचुरेआतापर्यंत अनेक मराठी नाटकांनी 500 किंवा 1000 प्रयोग पूर्ण केले आहेत. पण मराठी भाषेची मावशी समजल्या जाणा-या कोकणी भाषेतल्या नाटकानं पहिल्यांदाच 50 नाटकांचा टप्पा पार केला आहे. नाटकाचं नाव ' नंदादीप ' आहे. कोकणी नाट्यसृष्टीसाठी तर हा एक विक्रमच आहे.मुंबईतल्या कोकणी त्रिवेणी कला संगम या संस्थेने आपल्या नंदादीप या कोकणी नाटकाचे 50 प्रयोग पूर्ण करून आपलं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदवलं. मधुसूदन कालेलकरांच्या दिवा जळू दे सारी रात या गाजलेल्या नाटकाचा हा कोकणी अनुवाद आहे. ' नंदादीप ' सारखी अशी अनेक नाटकं भविष्यात सादर करून कोकणी भाषेची ओळख पूर्ण महाराष्ट्राला करून देण्याचा मानस या गोवेकरांचा आहे.

close