‘बेरोजगार असला तरीही पत्नीला पोटगी द्यावीच लागणार’

May 23, 2013 9:22 AM0 commentsViews: 182

नागपूर 23 मे : नोकरी नसली, पती बेरोजगार असला तरी तो पत्नी आणि अपत्याच्या जबाबदारीतून सुटू शकत नाही, त्याला पोटगी द्यावीच लागणार असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. यामुळे राज्यातल्या अन्यायग्रस्त घटस्पोटीत महिलांना न्याय मिळणार आहे. पतीकडून पोटगी मिळावी यासाठी एका महिलेनं उच्चन्यायालयात दाद मागितली होती. मला आणि माझ्या सात महिन्यांच्या मुलीच्या पालनपोषणासाठी पतीने पोटगी द्यावी असं या महिलेचं म्हणणं होतं. सुरूवातीला कुटुंब न्यायालयाने तीचं म्हणणं नाकारलं होतं. मात्र उच्च न्यायालयाने तीच हे म्हणणं मान्य करून पतीने तीला दर महिन्याला दीड हजार रूपये आणि मुलीला एक हजार रूपये असे मिळून अडीच हजार रूपये द्यावेत असे आदेश दिले आहेत.

close