मुख्यमंत्र्याचा इशारा

January 8, 2009 5:17 PM0 commentsViews: 1

9 जानेवारी, मुंबईसंपावर गेलेले तेल कंपन्यांचे अधिकारी सकाळी नऊ वाजेपर्यंत कामावर हजर झाले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करू, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. वाहतूकदार आणि तेल कंपन्यांनी पुकारलेला संपासंबंधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला. वाहतूकदार आणि तेल कंपन्यांनी पुकारलेला संप चुकीचा आहे. त्यांच्याविरुद्ध राज्य सरकारनं मेस्मा लागू केला आहे. सार्वजनिक वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देऊ, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसंच सीएनजी गॅसच्या तुटवड्यामुळे बस, टॅक्सी आणि ऑटोवर परिणाम होईल.आता बेस्ट आणि एसटीकडे एक दिवसाचा इंधनसाठा आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. इंधनाच्या पुरवठ्याबाबत लष्कराकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच इंधनाच्या तुटवड्याबाबत राज्य सरकार पेट्रोलियम मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.

close