बिलासाठी डॉक्टराचा रूग्णाच्या नातेवाईकावर गोळीबार

May 23, 2013 2:07 PM0 commentsViews: 25

इंदापूर 23 मे : 15 हजार्‍यांच्या बिलासाठी रुग्णाच्या नातेवाईकावर डॉक्टराने गोळीबार केल्याची विचित्र आणि धक्कादायक घटना घडलीय. ही धक्कादायक घटना डॉ.सी.ए.पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये घडली. आपल्या नातीच्या मोडलेल्या हातावर बापुराव दगडे उपचार करुन घेत होते डॉ.सी.ए.पाटील आणि बापुराव दगडे यांच्यात हॉस्पिटलच्या बिलावरुन वाद झाला होता. यानंतर चिडलेल्या डॉक्टरांनी घरातून पिस्तुल आणून दगडेंवर गोळीबार केला तसंच पिस्तुलाच्या मुठीने त्यांच्या डोक्यात घाव घातले. या गोळीबारात ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान. डॉ.सी.ए.पाटील यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close