कोल्हापुरात टोलविरोधात आंदोलन पुन्हा पेटणार ?

May 23, 2013 2:57 PM0 commentsViews: 23

कोल्हापूर 23 मे : टोल विरोधात आंदोलन शांत होऊन काही दिवस होत नाही तोच पुन्हा टोलविरोधी आंदोलन भडकण्याची शक्यता आहे. शहरात येत्या शनिवारपासून टोल सुरू होण्याची शक्यता आहे.आयआरबी कंपनीने शहरात 220 कोटी रूपयांचा रस्ते विकास प्रकल्प राबवलाय. त्या मोबदल्यात शहरातल्या 9 टोल नाक्यांवरून टोल सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनीने महापालिकेला पत्र दिलं असून टोल विरोधी कृती समितीचा आणि नागरिकांचा टोलला तीव्र विरोध आहे. पण खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनाने सगळ्या टोल नाक्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, या टोलला लोकप्रतिनिधींनीही विरोध केला असून काँग्रेसचे सहयोगी सदस्य खासदार सदाशिवराव मंडलीक यांनी टोलला विरोध कायम ठेवला आहे.

close