बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचा खर्च सेनेनं केला जमा

May 23, 2013 3:03 PM0 commentsViews: 35

मुंबई 23 मे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेने खर्च केलेली 5 लाखांची रक्कम शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महापालिकेकडे जमा केली आहे. अंत्यसंस्कारासाठी खर्च झालेली रक्कम महापालिका भरणार असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. आता उद्धव ठाकरे यांनी पाच लाखांचा चेक देऊन केलेल्या या वादावर पडदा टाकला आहे. अंत्यसंस्काराबाबत झालेल्या खर्चाबाबतच्या उलटसुलट बातम्यांनी आपण व्यथीत झालो असून आपण पाच लाखांचा चेक देत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

close