ब्रिटनमध्ये दहशतवाद्यांनी केला सैनिकाचा शिरच्छेद

May 23, 2013 4:47 PM0 commentsViews: 8

लंडन 23 मे : ब्रिटनमध्ये दिवसाढवळ्या एका ब्रिटीश सैनिकाचं शीर धडावेगळं केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा दहशतवादी हल्ला असल्याचं ब्रिटीश सरकारनं म्हटलं आहे. हा हल्ला म्हणजे इस्लामला दगा असल्याचं ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये वूलविच भागात सैन्याच्या बराकीबाहेर दोन सशस्त्र माणसांनी हे कृत्य केलंय.

घटनेनंतर तिथं पोहोचलेल्या पोलिसांनी दोन्ही अतिरेक्यांवर गोळीबार केला. त्यांच्यावर लंडनमधल्याच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी त्या दोघांपैकी एक सुरा हाती घेऊन इकडेतिकडे धावत होता असं सांगण्यात येतंय. तसंच ब्रिटीश सैनिकांनी परदेशात केलेल्या अन्यायाचा हा बदला असल्याचे दोघा हल्लेखोरांपैकी एकानं म्हटलं आहे. ही थरारक घटना कॅमेर्‍यातही कैद झाली.

हल्लेखोरीची धक्कादायक कबुली

अल्लाहची शपथ, तुम्ही आमचा पिच्छा सोडत नाही तोवर आम्ही लढू. डोळ्याच्या बदल्यात डोळा, हाच न्याय आहे. महिलांना आज हे पहावं लागलं, त्याबद्दल मी माफी मागतो. पण, आमच्या भूमीवरच्या स्त्रियांनाही हेच बघावं लागतं. तुम्ही कधीही सुरक्षित राहणार नाही. तुमचं सरकार पाडा. ते तुमची काळजी करत नाही. तुम्हाला काय वाटतं, आम्ही रस्त्यावर केलेल्या गोळीबारात डेव्हिड कॅमेरून ठार होती. नाही, रस्त्यावर तुमच्यासारखी सामान्य माणसंचं मारली जातील.

close