संपाचा सर्वसामान्यांना फटका

January 9, 2009 5:35 AM0 commentsViews: 7

9 जानेवारी, मुंबई तेल कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहेत. राज्यातील जवळपास सर्व पेट्रोल पंपावरील साठा संपत आला आहे. त्यातच तेल कर्मचार्‍यांची राज्य सरकारशी चाललेली बोलणी फिस्कटली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.पुण्याच्या पीएमटी प्रशासनाकडं आता केवळ आजच्या दिवसच पुरेल एवढाच इंधन साठा शिल्लक आहे. त्यामुळं वाहतुकीवर चांगलाच परिणाम जाणवणार आहे. पुणेकरांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागण्याची चिन्ह दिसू लागलीयत. राज्यासह संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्यांना आता तेल अधिकार्‍यांच्या संपाचा फटका बसतो आहे. मुंबईमध्ये तर टॅक्सी आणि रिक्षांना इंधन मिळत नसल्यामुळं त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एचपीचे पेट्रोलपंप चालू असल्यामुळं त्या पंपांवर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. आणि इतर चालू पंपांवरचं इंधन संपल्यावर काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे.नागपूरमधे 130 पैकी 100 पेट्रोलपंप बंद आहे. पेट्रोल टंचाईमुळं टू व्हिलर, आणि ऑटो रिक्क्षा स्थितीही आता बिकट झाली आहे.विदर्भामध्येही सध्या सर्वसामान्य लोकांना अडचणीला सामोर जावं लागतंय.औरंगाबादमध्ये सुद्धा कठीण परिस्थिती आहे. 95% पट्रोल पंप बंद आहेत. दुपारपर्यंत पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. मात्र तो संपल्यानंतर औरंगाबादच्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.नाशिकमध्ये कामावर जाण्यात लोकांना अडचणी येत आहेत. नाशिकची बससेवा सक्षम नसल्यामुळं सर्वसामान्य लोक टु व्हिलर किंवा रिक्षावरतीच अबलंबून असतात. पण इंधनाअभावी बर्‍याच लोकांना आपल्या गाड्या रस्त्यातच पार्क करून जावं लागतंय. नाशिकचे सुमारे 90 % पेट्रोल पंप बंद झाले आहेत आणि चालू असलेल्या 11 पेट्रोल पंपांवरती मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.

close