मय्यप्पन यांना अटक होणार ?

May 24, 2013 9:34 AM0 commentsViews: 5

मुंबई 24 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ाज चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मय्यप्पन यांना चौकशीसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. आज कोणत्याही परिस्थिती मय्यप्पन यांना मुंबई पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे. मात्र मय्यप्पन यांनी चौकशीसाठी टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गुरुनाथ मय्यप्पन यांना मुंबईत येता क्षणी अटक होण्याची शक्यता असून मुंबई पोलिसांनी अटकेची तयारीही केलीय.

गुरूवारी गुरुनाथ मय्यप्पन यांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं एक पथक चेन्नईत त्यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र मय्यप्पन हे चेन्नईत नव्हते. यामुळे पोलिसांनी मय्यप्पन यांना समन्स बजावली होती. आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिलेय. मय्यप्पन विंदू दारा सिंग याच्या संपर्कात होते अशी विंदू दारा सिंगच्या फोन कॉल्सवरून माहिती मिळाली होती. आणि त्याचमुळे मॅच फिक्सिंगशी मय्यपन्न यांचा काही संबंध आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत. मात्र मय्यप्पन टाळाटाळ करत असल्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावलाय.

close