उजनी धरणाची पाणी पातळी वजा 49 टक्के

May 24, 2013 9:48 AM0 commentsViews: 70

सोलापूर 24 मे : उजनी धरणाची पातळी वजा एकोणपन्नास टक्क्यांवर जाऊन पोहोचल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीय. सोलापूरसह बार्शी, पंढरपूर, माढा, करमाळा, टेंभूर्णी या शहरांसह शेकडो गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ही 117 टीएमसी एवढी आहे. त्यातील 53 टीएमसी पाणी साठा हा उपयुक्त आहे. तर 64 टीएमसी पाणी साठा हा मृत पाणी साठा आहे. सध्या उजनी धरणात 37. 70 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे . तर धरणाची पाणीपातळी वजा 48.46 टक्क्यांवर पोहोचल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना अडचणीत आल्या आहेत. मान्सून वेळेवर न आल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

close