जनावरांना मायेचा हात,महिलांनी उभारली चारा छावणी

May 24, 2013 9:53 AM0 commentsViews: 34

बीड 24 मे : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना आता महिलादेखील चारा छावण्या स्थापन करण्यासाठी पुढे येत आहेत. बीड जिल्ह्यात सध्या 72 छावण्या सुरु आहेत. आष्टी तालुक्यातल्या पिंपरी घुमरी इथल्या महिलांनीही यात एक छावणी उभारली आहे. या छावणीत जवळपास पंधराशे लहान मोठी जनावरं आहेत. या जनावरांना चारा पेंड, पाणी अशा सर्व प्रकारच्या गोष्टी पुरवण्यात येत आहे. याशिवाय या जनावरांच्या मालकांच्या जेवणाखाण्याची सोयही या छावणीत करण्यात आली आहे. माऊली महिला मंडळाच्या वतीने ही छावणी चालवली जात आहे. मात्र त्यात अनेक अडचणीही येत आहेत तरीही या अडचणींवर मात करुन छावणी व्यवस्थित चालवण्यात येत असल्याचं इथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

close