एलबीटीबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन होणार

May 24, 2013 11:35 AM0 commentsViews: 11

मुंबई 24 मे : एलबीटी बाबतची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची बैठक संपली आहे. शरद पवार यांची या प्रकरणात केलेली शिष्टाई यशस्वी झाली आहे. आता एलबीटीबाबत निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापण्यात येणार आहे.आणि महत्त्वाची बाब म्हणजे या उच्चस्तरीय समितीत आता व्यापार्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे. या पूर्वी एलबीटीबाबत सरकारने स्थापलेल्या समितींमध्ये व्यापारांच्या समावेश नसल्याचा आक्षेप व्यापारांनी घेतला होता. एक महिन्यात ही समिती अहवाल सादर करणार आहे. मात्र एलबीटीला स्थगिती देण्याची व्यापारांची महत्त्वाची मागणी मात्र सरकारनं मान्य करण्यास नकार दिला आहे.

close