विंदू दारा सिंगच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ

May 24, 2013 12:01 PM0 commentsViews: 8

मुंबई 24 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला अभिनेता विंदू दारा सिंगच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. विंदू दारा सिंगच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय. पण, त्याचाकडून अजून बरीच माहिती मिळू शकते असं पोलिसांनी किल्ला कोर्टात सांगितलं. यानंतर कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत आणखी 4 दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. याशिवाय, मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेले बुकी प्रेम तनेजा आणि अल्पेश पटेल यांच्या पोलीस कोठडीतही 28 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

close