राशीचक्रकार शरद उपाध्येंवर जमीन बळकावण्याचा आरोप

May 24, 2013 12:13 PM0 commentsViews: 151

कोल्हापूर 24 मे : राशीचक्रकार शरद उपाध्ये यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नृसिंहवाडीमध्ये उपाध्ये यांनी ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे. उपाध्येंनी नृसिंहवाडीमध्ये वेदभवन उभारलंय. पण त्याच्या शेजारी असलेली ग्रामपंचायतीची जागाही बळकावली.

इतकंच नाही तर, त्यांनी 12 वर्षांचा 2 लाख रुपये घरफाळा म्हणजेच करही भरलेला नाही असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील आणि अधिकार्‍यांचा मोठा दबाव असल्याचंही गावकर्‍यांनी सांगितलं आहे. जर हे अतिक्रमण काढलं नाही तर, उपाध्येंच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा गावकर्‍यांनी दिला.

close