मय्यप्पन यांना चौकशीनंतर अटक ?

May 24, 2013 2:53 PM0 commentsViews: 5

मुंबई 24 मे : चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ आणि बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन मुंबईत दाखल झाले आहेत. पण मय्यप्पन यांना विमानतळावर अटक होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.

मय्यप्पन यांची आधी मुंबई पोलिसांकडून चौकशी होईल आणि यानंतर अटकेबाबात निर्णय होणार आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड ऍक्टर विंदू दारा सिंगनं दिलेल्या माहितीनुसार मय्यप्पन यांनी आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात बेटिंग केली होती.

मय्यपन यांनी प्रत्येक मॅचमध्ये 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत बेटिंग केलं होतं. मय्यपन यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या 3 मॅच आणि इतर काही मॅचमध्ये बेटिंग केल्याची माहिती मिळतेय. मयप्पन यांना अटक केली तर बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन राजीनामा देतील, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

close