‘त्या’ अल्पवयीन मुलीचा मृत्यू

May 25, 2013 1:19 PM0 commentsViews: 19

नागपूर 25 मे : इथं मनीषनगर भागात एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता. आज त्या मुलीचा दुदैर्वी मृत्यू झालाय. या जाळण्याच्या घटनेत ही मुलगी 90 टक्के भाजली होती. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा आज मृत्यू झाला.अजूनही याप्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही. पोलिसांचा तपास अजून सुरुच आहे.

नागपूरच्या मनिषनगर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत शुक्रवारी सकाळी एक मुलगी जळालेल्या अवस्थेत सापडली होती. याच ठिकाणी सिगारेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या आणि धारदार चाकू सापडला. त्यामुळे या मुलीवर बलात्कार करून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. ही मुलगी 90 टक्के भाजली होती तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. दोन दिवस उलटले उलटले तरी, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. आरोपींचे धागेदोरे शोधण्यात देखील पोलीस अपयशी ठरले आहे.

close