एफबीआयचा स्वतंत्र तपास नाही

January 9, 2009 7:37 AM0 commentsViews: 5

9 जानेवारी एफबीआयने आता स्पष्ट केलंय की ते 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यांचा स्वतंत्र तपास करणार नाही.भारतानेच तपास करून दोषींना शिक्षा द्यावी,असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईवरच्या हल्ल्यांत 6 अमेरिकन नागरिक मरण पावले होते. आणि अमेरिकेतल्या कायद्यानुसार त्यांचे नागरिक कोणत्याही देशात मरण पावले तरी एफबीआयने त्याचा वेगळा तपास करणं बंधनकारक आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या दौ-याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री पुरावे सादर करण्यासाठी अमेरिकेत जाणार होते. आता याबाबत 20 जानेवारीनंतर निर्णय घेतला जाईल. कारण 20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओबामा पदभार सांभाळणार आहेत.

close