कोल्हापुरात टोल नाक्यावरून पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

May 25, 2013 5:50 PM0 commentsViews: 38

कोल्हापूर 25 मे : टोल वसुली तुर्तास टळली जरी असली मात्र आज रात्री टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शहरातील शिरोली टोलनाक्यावर रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात हजारो नागरिक जमा झाले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची मोडतोड सुरू केल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण झालंय. अजूनही या भागात तणावाचं वातावरण आहे. आंदोलकांनी टोल नाका जाळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना अडवलं.

दरम्यान, टोलवसुलीवर मुख्यमंत्र्यांशी आणि नगरविकासमंत्र्यांशी चर्चा करुन याबाबत पुढचा निर्णय घेतला जाईल, असं कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापुरात आज पासून होणारी टोल वसुली टळलीय. आयआरबी कंपनीशहरातल्या 9 टोलनाक्यांवर टोल सुरू करणार आहे. दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना मात्र टोलमधून वगळण्यात आलंय. या टोलला टोल विरोधी कृती समितीचा तीव्र विरोध आहे. ही समिती आज संध्याकाळी शिरोली टोल नाक्यावर आंदोलन करणार्‍यासाठी जमली होती. यावेळी आंदोलनला हिंसक वळण लागलं.

close