मुंबई इंडियन्स ‘किंग';सचिनचा IPL ला अलविदा

May 26, 2013 6:12 AM0 commentsViews: 71

कोलकाता 27 मे : आयपीएलच्या सहाव्या हंगामाची मुंबई इंडियन्स किंग ठरली आहे. दोन वेळा विजेतेपद पटकावणार्‍या चेन्नई सुपर किंग्जला 23 रन्सने धूळ चारत मुंबईच्या यंग बिग्रेडने शानदार विजय मिळवून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अनोखी भेट दिलीय.मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. तर चेन्नईचं तिसर्‍या वेळेस विजेतेपद पटकावण्यात अपयशी ठरलीय. ईडन गार्डनवर झालेल्या थरारक सामन्यात विजयानंतर मुंबईच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे सचिनने आयपीएलमधून निवृत्त होण्याची घोषणा केली.

आयपीएलच्या सहाव्या हंगामातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या 16 धावात मुंबईचे सलामीवीर फलंदाज तंबूत परतले. स्मित 4 रन्स, आदित्य तारे 0 रन्सवर आऊट झाले. मॉरिसने दिनेश कार्तिकचा त्रिफळ उडवत तंबूत पाठवले. कार्तिकने 21 रन्स केले.त्यानंतर टीमची धुरा सांभळण्यासाठी आलेला कर्णधार रोहित शर्मा 2 रन्स करून आऊट झाला. संकटात सापडलेल्या मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पोलार्डने सावरले. पोलार्ड आणि अंबाती रायडून संयमी फलंदाजी करत समाधानकारक धावसंख्या उभी केला. पोलार्डच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने चेन्नईला 149 धावांचे आव्हान दिले.

149 धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जची सुरूवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये लसिथ मलिंगाने दोन गडी बाद करत चेन्नईला बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर मिशेल जॉन्सनने दुसर्‍या ओव्हरमध्ये ब्रदीनाथला आऊट करत 3 बाद 3 रन्स अशी अवस्था केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या बॉलरपुढे 'चेन्नई एक्स्प्रेस'चा प्रवास खडतर झाला. एकापाठोपाठ एक खेळाडूने तंबूचा रस्ताच धरला. मायकल हसी (1)रन्स, सुरेश रैना (0) रन्स, विजय(18), ब्राव्हो (15), जडेजा (0), अल्बी मार्केल (10), मॉरिस (0), आऱ. आश्विन (9) स्वस्तात आऊट झाले. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोणीने एकाकी झुंज देत नाबाद 63 रन्स केले. अखेर निर्धारीत 20 ओव्हरमध्ये चेन्नई संघ 125 रन्सवर गारद झाला. मुंबईकडून लसिथ मलिंगा, मिशेल जान्सन आणि हरभजनने दोन-दोन विकेट घेतल्या. तर प्रज्ञान ओझा,पोलार्ड आणि धवनला एक-एक विकेट घेतल्या. 2010 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा 22 रन्सने पराभव केला होता. अखेर आज पराभवाचा वचपा काढत मुंबईने आयपीएलच्या किंग होण्याचा किताब पटकवलाय.

close